पंढरपूर वारीतील वारकऱ्यांना बुरुड समाज संघटनेतर्फे घोंगडी व औषधांचे वाटप
खामगाव (प्रतिनिधी):बुलढाणा जिल्हा बुरुड समाज संघटनेच्या वतीने आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या भाविक-वारकऱ्यांसाठी मोफत घोंगडी व आवश्यक औषधांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम काल, दिनांक २३ जुलै रोजी पार पडला.
पंढरपूर वारीदरम्यान वारकऱ्यांना हवामानातील बदलांमुळे आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू नये तसेच पावसापासून संरक्षण व्हावे, या सामाजिक जाणीवेतून बुलढाणा जिल्हा बुरुड समाज संघटनेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. वारीत चालणाऱ्या अनेक भाविकांना यावेळी घोंगडी आणि प्रथमोपचारासाठी लागणाऱ्या औषधांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाप्रसंगी बुलढाणा जिल्हा बुरुड समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष हितेश पदमगिरवार, जिल्हा सचिव सुनील गुळवे, खामगाव नगरपरिषदेचे नगरसेवक विजय पदमगिरवार, राजेश गुळवे शहराध्यक्ष नरेश मसनेवार* यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच कार्यक्रमाला निलेश गुळवे, आनंद गुळवे, दुर्गेश गुळवे, चेतन नागेश्वर, बंडू कणकेनवार, राम कुटे, अनंता देशमुख, प्रकाश कुंदलवार, गोलू गुळवे, जतीन नागेश्वर, आकाश नागेश्वर** यांसह संघटनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुरुड समाज संघटनेच्या या उपक्रमाचे वारकऱ्यांकडून आणि नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.

Post a Comment