अग्रवाल हॉस्पिटल येथे दोन्ही गुडघे बदलीची यशस्वी शस्त्रक्रिया
डॉ. नितीश अग्रवाल यांच्या कौशल्यावर रुग्णांचा वाढता विश्वास
खामगाव: खामगाव येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश अग्रवाल यांनी मागील 7 वर्षांपासून अस्थिरोग संबंधित अनेक मोठमोठ्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. म्हणून त्यांना विदर्भासह राज्यातील विविध शहरांमधून उपचारासाठी रुग्णांची पसंती मिळत आहे. डॉ. नितीश अग्रवाल यांनी परतवाडा येथील एका रुग्णावर एकाच वेळी दोन्ही गुडघ्यांचे (Bilateral Total Knee Replacement) यशस्वी प्रत्यारोपण करून आणखी एक जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. अनेक वर्षांपासून तीव्र संधिवात, गुडघ्यांची झीज आणि असह्य वेदनांमुळे चालणेही कठीण झालेल्या रुग्णाला या शस्त्रक्रियेमुळे वेदनामुक्त आणि सक्रिय जीवनाची नवी आशा मिळाली आहे.
डॉ. नितीश अग्रवाल हे एम.एस. (ऑर्थोपेडिक्स) असून त्यांनी सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे विशेष प्रशिक्षण (Advanced Knee Replacement Training) घेतले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, अचूक शस्त्रक्रिया तंत्र आणि शस्त्रक्रियेनंतरच्या पुनर्वसनावर विशेष भर देत ते खामगावमध्ये नियमितपणे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करत आहेत.
आजपर्यंत अग्रवाल हॉस्पिटलमध्ये डॉ. नितीश अग्रवाल यांच्या हस्ते अनेक यशस्वी टोटल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून रुग्णांना उत्कृष्ट परिणाम मिळत आहेत. Bilateral Knee Replacement सारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही सुरक्षितपणे आणि यशस्वीरीत्या पार पडत असल्याने रुग्णांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
शस्त्रक्रियेनंतर संबंधित रुग्णाची प्रकृती उत्तम असून फिजिओथेरपीच्या मदतीने अल्पावधीतच रुग्णाने चालण्यास सुरुवात केली आहे. आधुनिक उपचार पद्धतीमुळे वेदना कमी होणे, हालचालींमध्ये सुधारणा होणे आणि दैनंदिन जीवनात जलद पुनरागमन शक्य होत असल्याचे डॉ. नितीश यांचे मत आहे.
डॉ. नितीश अग्रवाल म्हणाले, "गुडघ्यांची तीव्र झीज झालेल्या निवडक रुग्णांमध्ये एकाच वेळी दोन्ही गुडघ्यांचे प्रत्यारोपण हा प्रभावी पर्याय ठरू शकतो. योग्य रुग्ण निवड, आधुनिक शस्त्रक्रिया तंत्र आणि नियोजित पुनर्वसन यामुळे उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात. आता अशा उपचारांसाठी मोठ्या महानगरात जाण्याची आवश्यकता नाही; खामगावमध्येच जागतिक दर्जाच्या तत्त्वांनुसार उपचार उपलब्ध आहेत." अग्रवाल हॉस्पिटलमध्ये आधुनिक ऑपरेशन थिएटर, अनुभवी भूलतज्ज्ञ, प्रशिक्षित ऑपरेशन थिएटर टीम आणि अत्याधुनिक पुनर्वसन सुविधा उपलब्ध असल्यामुळे सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या जात आहेत.
.अल्पावधीतच उत्कृष्ट शस्त्रक्रिया परिणाम, आधुनिक उपचारपद्धती आणि रुग्णकेंद्रित सेवेमुळे अग्रवाल हॉस्पिटल हे खामगाव आणि परिसरातील सांधेरोपण उपचारांसाठी विश्वासार्ह केंद्र म्हणून ओळख निर्माण करत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

Post a Comment