खामगाव येथील डॉ. अश्विनी राठोड यांचा 'कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६' ने गौरव
शेगाव, दि. २१ जुलै : समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या SVPC फाउंडेशनच्या 'कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६' सोहळ्यात डॉ. अश्विनी जीवन राठोड यांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिस एशिया 2025 दुबई येथील गायत्री रोहनकर यांच्या हस्ते तर चिखली येथील जयश्री घाटे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
या पुरस्काराद्वारे समाजपरिवर्तन, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. डॉ. अश्विनी राठोड यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील योगदानाची पोचपावती मानला जात आहे.
या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, मित्रपरिवार व हितचिंतकांनी डॉ. अश्विनी जीवन राठोड यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


إرسال تعليق