जीवघेण्या रेस्क्यू नंतर गौसेवकांनी टाक्यात अडकलेल्या नंदीला सुखरूप बाहेर काढले
खामगाव :- आज दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजता शहरातील बारादरी, अशोक गेस्ट हाऊसच्या बाजूला राहणारे झुनझुनवाला यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये आज सकाळी एक बेवारस नंदी घराचा गेट उघडून आत शिरला.
टाक्यावर ठेवलेल्या पटल्याचा धाबा नंदीच्या वजनाने तुटून तो थेट सिमेंटने पूर्ण घोटाई केलेल्या एकदम सपाट पाण्याच्या टाक्यात पडला. टाका पूर्ण सपाट असल्याने आणि आतल्या भिंतींवर शेवाळ असल्यामुळे हात-पाय घसरत होते. त्यामुळे नंदीला बाहेर काढणे अत्यंत कठीण झाले होते. घटनेची माहिती मिळताच एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे सक्रिय गौ सेवक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जीवाची पर्वा न करता गौ सेवक सुरजभैय्या यादव, गौरव कवटेकर, राहुल ठाकूर, नितीन चंदेल, पवन वानखडे, मोहन उगले, विलास क्षिरसागर, पियुष झुनझुनवाला, लाखा भाई व इतर गौसेवकांनी 1 तासाहून अधिक काळ जीवघेणा रेस्क्यू ऑपरेशन राबवले. नंदीचे वजन जास्त असल्याने पहिल्यांदा दोरी तुटून पडली. तरीही गौसेवकांनी खंबीरपणे पुन्हा प्रयत्न करून नंदीला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. जिव वाचल्यानंतर नंदीने मोकळा श्वास घेतला व पायी चालत निघून गेला. गौसेवकांच्या या धाडसी आणि चिकाटीच्या कार्यामुळे नंदीचे प्राण वाचले. परिसरातील नागरिकांनीही गौसेवकांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन नेहमीच गौसेवेसाठी तत्पर आहे

Post a Comment