पिं.राजा येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाचे शनिवारी आयोजन
खामगाव:- साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त पिंपळगाव राजा येथे शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी भव्य जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विर लहुजी नवयुवक सांस्कृतिक व क्रीडा मंडळ तसेच समस्त मातंग समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता लहुजी चौक, पोलीस स्टेशनसमोर, घाणेगाव वेस, पिंपळगाव राजा येथे होणार असून, यानिमित्त मिरवणूक व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य व लेखनावर आजही मोठ्या प्रमाणात अभ्यास व संशोधन होत असून, त्यांच्या विचारांचा समाजामध्ये प्रसार व्हावा, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून समाजप्रबोधक डॉ. रामपाल महाराज यांचा समाजप्रबोधनपर कार्यक्रम सायंकाळी ६ ते ९ वाजता पिंपळगाव राजा येथे होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक प्रदीप पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगाव), भाजपा सोशल मीडिया संयोजक सागर फुंडकर असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. प्रकाश गायकरवाड राहणार आहेत. कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून प्रशांतराव देशमुख, (अध्यक्ष, प्रेस क्लब खामगाव)यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. संजय पाटोळे व प्रदीप वानखडे करणार आहेत. अध्यक्ष पवन पाटोळे, उपाध्यक्ष सुरज वानखडे, कार्याध्यक्ष सहदेव चंदनशिव, कोषाध्यक्ष दिलीप पाटोळे, सल्लागार संतोष पाटोळे व सचिव फकीर कांबळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.
अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी तसेच मिरवणूक व जाहीर सभेला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वीर लहुजी नवयुवक सांस्कृतिक क्रीडा मंडळ व समस्त मातंग समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment