इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी पत्रकार भोकरे

बुलढाणा (प्रतिनिधी )-  पत्रकारितेच्या च्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच सर्वसामान्यांच्या समस्या शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी सदैव कार्यरत असलेल्या इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी खामगाव येथील पत्रकार  तथा संपादक विनोद भोकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सिराज अहमद कुरेशी यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष सैय्यद जाकीर हुसैन यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली.

      इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून न पत्रकारांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्याबरोबरच वंचित, गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्याचे काम केले जाते. पत्रकारांनी निर्भीडपणे आपली भूमिका मांडावी, यासाठी संघटना सातत्याने पत्रकारांच्या पाठीशी उभी राहत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. नवनियुक्त प्रदेश कार्याध्यक्ष विनोद भोकरे यांनी नियुक्तीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष सिराज अहमद कुरेशी व प्रदेशाध्यक्ष सैय्यद जाकीर हुसैन यांचे आभार मानले.

स्वतंत्र, निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता ही लोकशाहीची मजबूत आधारशिला आहे. पत्रकारांनी सत्यााच्या बाजूने उभे राहून समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे. पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन यापुढेही खंबीरपणे पाठीशी उभी राहणार असल्याचे विश्वास विनोद भोकरे यांनी व्यक्त केला.



Post a Comment

أحدث أقدم