जीवनावश्यक वस्तूंचे भाव अबब पेक्षाही वर ; सर्वसामान्यांच्या बजेटला फटका


खामगाव | दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर मोठा परिणाम होत आहे. साखर, खाद्यतेल, डाळी, तांदूळ, गहू यांसह विविध जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने महिन्याचा किराणा खर्च वाढत चालला आहे. सध्या बाजारात साखरेचा दर सुमारे ८० रुपये किलो, तर खाद्यतेलाचे दर १७० रुपये लिटरपर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहे.

घरखर्चातील मोठा हिस्सा किराणा सामानासाठी खर्च होत असल्याने वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबांना बसत आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढत असल्याने अनेक कुटुंबांना दैनंदिन गरजांमध्ये काटकसर करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم