लहुजी विद्रोही सेनेच्या भोजन स्टॉलला डीवायएसपी यांची सदिच्छा भेट
खामगाव : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त लहुजी विद्रोही सेना, खामगाव शहरच्या वतीने उभारण्यात आलेल्या भोजन स्टॉलला खामगावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (Addl. SP) मा. पियुष जगताप आणि उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) मा. प्रदीप पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच लहुजी विद्रोही सेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा. रुपेश अवचार यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जयंतीच्या शुभेच्छा देत, "तुम्ही समाजहिताचे कार्य याच उत्साहाने सुरू ठेवा, तुमची प्रगती अशीच होत राहो," अशा शुभेच्छाही व्यक्त केल्या.
डॉ. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त लहुजी विद्रोही सेना, खामगाव शहरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळातील कार्यकर्ते तसेच सर्व नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोळी व काशीफळाच्या भाजीचे भोजन भाविक आणि नागरिकांना वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी पवन माळवंदे, रामा गायकवाड, देवराव अवचार, हरिभाऊ अवचार, देविदास धमेरीया, नामदेव अवचार, प्रभाकर गायकवाड, अविनाश ईगळे, आकाश गायकवाड, प्रविण रिछारिया, डॉन धमेरीया, सचिन अवचार, कपिल अवचार, ओम अवचार, हर्ष धमेरीया, करण अवचार, अभय धमेरीया, वेदांत धमेरीया यांच्यासह लहुजी विद्रोही सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खामगाव शहरातील मातंग समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

إرسال تعليق