चाळीसटापरीत विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा

बुलढाणा : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेवटचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाळीसटापरी येथे विश्व आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून एकमेकांना विश्व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पारंपरिक संस्कृती, वेशभूषा आणि एकजुटीचे दर्शन या कार्यक्रमातून घडले. आदिवासी समाजाच्या समृद्ध परंपरा व संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. 🌹

Post a Comment

أحدث أقدم