नोंदणी व अधिक माहितीसाठी मो. 9762901889 / 8668878220 वर संपर्क करावा. 

खामगाव,( नितेश मानकर )– JCI Khamgaon City यांच्या वतीने नागरिकांच्या आरोग्य जनजागृतीसाठी संपूर्ण रक्त आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर Manipal TRUtest यांच्या सहकार्याने पार पडणार आहे.  हे शिबिर रविवार, दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7.00 ते 11.00 या वेळेत राठी हॉस्पीटल, बुलडाणा अर्बन बँकेच्या जवळ, शाळा क्र. 6 जवळ, खामगांव येथे आयोजित करण्यात आले आहे.

या विशेष हेल्थ चेक-अप पॅकेजमध्ये खालील तपासण्यांचा समावेश आहे: Complete Blood Count (CBC / Hemogram),

Glycosylated Hemoglobin (HbA1c),  Thyroid Profile (T3, T4, TSH), Lipid Profile, Liver Function Test, Kidney Profile Test, GFR (Glomerular Filtration Rate),  Electrolytes (Na+, K+, Cl-),Vitamin B12,  25 OH Vitamin D3 इत्यादी सर्व तपासण्या साधारणतः ₹5600/- किमतीच्या असून, या शिबिरात केवळ ₹1000/- या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तपासणीसाठी येताना नागरिकांनी रिकाम्या पोटी (फक्त पाणी पिऊन) यावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. तपासणीचे अहवाल 10 ते 12 दिवसांत उपलब्ध होतील.

या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. खामगाव व परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जेसीआय खामगांव सिटी तर्फे करण्यात आले आहे.  नोंदणी व अधिक माहितीसाठी मो. 9762901889 / 8668878220 वर संपर्क करावा. 



Post a Comment

أحدث أقدم