*खामगांव : सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणाऱ्या लॉयन्स क्लब खामगांव व धन्वंतरी चारिटेबल मेडीकल फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तेराव्या जिल्हास्तरीय स्व. श्रा.रा. बावस्कर गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी बुलडाणा जिल्ह्यातून ग्रामीण, शहरी, अंध, अपंग व कर्णबधीर, सेवानिवृत्त, वरिष्ठ महाविद्यालय या गटामध्ये प्रस्ताव मागविण्यात आले होते. बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षक वृंदांनी प्रतिसाद देत सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी व्दारे प्रस्ताव पाठविले होते. ह्या प्राप्त प्रस्तावांचे मुल्यमापन करुन खालील प्रमाणे पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची नांवे गटनिहाय जाहीर करण्यात आली आहेत. या पुरस्काराचे वितरण शुक्रवार दि. ०२ ऑक्टोबर २०२६ रोजी नगर परिषद लॉयन्स आय हॉस्पीटल सभागृह, नांदुरा रोड, खामगांव येथे प्रदान करण्यात येणार आहेत.*
![]() |
| Advt. |
*यावेळी जाहीर करण्यात आलेल्या प्राथमिक ग्रामीण विभागातून कु. मिनाक्षी शकुंतला नामदेव थोरात, विषय अध्यापिका (जि.प. कें. मराठी उच्च प्राथ. शाळा, अटाळी, ता. खामगांव), प्राथमिक शहरी विभागातून कु. वर्षा कुसुम ज्ञानेश्वर इंगळे, सहा. शिक्षिका (लोकमान्य बाळगंगाधर टिळक न.प. मराठी प्राथ. शाळा क्र ६, खामगांव), माध्यमिक शहरी विभागातून कु. जयश्री रत्नप्रभा महादेव ठेंगझोडे, पदविधर शिक्षिका (जि.प. हायस्कूल (मुले) खामगांव), माध्यमिक ग्रामीण विभागातून श्री. संजय सखुबाई रामचंद्र सावळे, मुख्याध्यापक (श्री. अनंतराव सराफ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेलापूर बु., ता. मोताळा), अंध,अपंग, कर्णबधीर, गतीमंद व आदिवासी विभागातून रोटरी मानव सेवा संस्था, खामगांव व्दारा संचालित रोटरी मतीमंद विद्यालय खामगांव, सेवा निवृत्त विभागातून सेवानिवृत्तीनंतरही सदैव कार्य करणारे श्री. यादवराव हरणाबाई पाटीलबा सुसर, सेवानिवृत्त शिक्षक (आदर्श मराठा प्राथमिक विद्यामंदिर, चिखली) व वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक विभागातून प्रा. डॉ. धनंजय प्रयागबाई सोपान तळवणकर, प्राचार्य (गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगांव) यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारप्राम आदर्श शिक्षकांना रु. ५००१ रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे.*
![]() |
*पुरस्कार वितरणाचा सोहळा शुक्रवार दि. ०२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १.३० वा. लॉयन्स आय हॉस्पीटल सभागृह, जीएसटी ऑफीस समोर, नांदुरा रोड, खामगांव येथे मान्यवर व लॉयन्स पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. पुरस्कार प्राप्म शिक्षकवृंदांना वैयक्तिकरित्या तसे कळविण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमास आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांनी सपत्नीक उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकांव्दारे लॉयन्स क्लब खामगांवचे अध्यक्ष लॉ. पिनेश कमाणी, सचिव तॉ. श्रमिक जैस्वाल व कोषाध्यक्ष लॉ. सागर गुर्जर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे.



إرسال تعليق