शिवाजी नगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; १० लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

१७ जणांवर कारवाई; रोख रक्कम, मोटारसायकली, मोबाईल व जुगाराचे साहित्य ताब्यात

खामगाव : शिवाजी नगर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २२ सप्टेंबर रोजी सुटाळा बु. परिसरातील एका शेतातील टिनशेडच्या खोलीत सुरू असलेल्या कथित ‘एक्का बादशहा’ जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत जुगार खेळताना १७ जण आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम, मोटारसायकली, मोबाईल फोन तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण १० लाख ३० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Advt.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मंदार पुरी घांचे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. रस्पोनि योगेश खटाने, नागेश जायले, पोउपनि अमित तळोले यांच्यासह शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील संदिप टाकसाळ बन 881, देवेंद्र शेळके बन 895, पोहेको निलसिंग चव्हाण चन 909, पोको केशव झाल्टे बन 2626, पोकी प्रविण गायकवाड बन 2676, नापोकी नितीन भालेराव बन 539, पोकों जितेश हिवाळे बन 2364, सचिन घुगे बन 238, नितीन माळोदे बन 127, मपोकी पल्लवी बोर्ड ब.न.1284, चालक पोहेको भगवान खोशे बन 1790 यांनी केली आहे. प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Advt.


Post a Comment

أحدث أقدم