मेष्टा आयोजित शिक्षक मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित

 खामगाव - कारंजा लाढ येथील कन्हैया रिसॉर्ट येथे संपन्न झालेल्या मेष्टा संघटनेच्या राज्य कार्यकारणीच्या सभेमध्ये अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीकरिता संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष तथा मेस्टा शिक्षक संघटनेचे विदर्भ अध्यक्ष कारंजा येथील किरण अर्जुनराव चौधरी यांच्या नावाची उमेदवार म्हणून सर्वानुमते घोषणा करण्यात आलेली आहे. 

30 ऑगस्ट रोजी मेस्टा संघटनेकडून कन्हैया रिसॉर्ट मध्ये शिक्षक मेळाव्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय तायडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संघटनेच्या राज्य पदाधिकारी व अमरावती विभागीय पदाधिकारी प्रा. रामकृष्ण गुंजकर जिल्हा पदाधिकारी श्रीकांत चोपडे ,सागर उकर्डे तसेच इतरही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक मेळाव्यानंतर मेस्टा संघटनेच्या राज्य कार्यकारिणी पदाधिकारी, विभागीय कार्यकारिणी पदाधिकारी तसेच पाच ही जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय तायडे पाटील, प्रदेश अध्यक्ष डॉ. नामदेवराव दळवी, राज्य उपाध्यक्ष अभिजित देशमुख, राज्य सचिव विनोद कुलकर्णी, राज्य संघटक अनिल असलकर श्रीकृष्ण गोरडे , मनिष हांडे, विश्वजीत चव्हाण, विदर्भ अध्यक्ष संतोष गडेकर, विभागीय अध्यक्ष संदीप गावंडे, सुभाष कोसलगे, मदन जिद्देवार, जिल्हाध्यक्ष सुभाष बोरकर, प्रशांत लांडे, साहेबराव भरणे, विशाल पवार आत्माराम चव्हाण, समस्त पदाधिकारी यांनी विचार विनिमय केल्यानंतर कारंजा लाड येथील गोविंद पब्लिक स्कूलचे शिक्षक तथा मेस्टाचे अमरावती विभागीय कार्याध्यक्ष, मेस्टा शिक्षक संघटनेचे विदर्भ अध्यक्ष किरण शिलाताई अर्जुनराव चौधरी यांना अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून निवडून द्यावयाच्या विधान परिषद निवडणूकीकरीता उमेदवारी सर्वानुमते जाहीर करण्यात आलेली असून तशी घोषणा संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय तायडे पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे 

Advt.

मेस्टा संघटना आगामी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवीत आहे.

Post a Comment

أحدث أقدم