किन्ही महादेव येथे पारंपरिक पद्धतीने गणपती विसर्जन मिरवणूक
किन्ही महादेव, ता. खामगाव अनंत तोडेकर यांची माहिती:- : ग्राम किन्ही महादेव येथे गणेशोत्सव उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. बाळ शिवाजी राजे गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गणरायाची विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि गणरायाच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.
विशेष म्हणजे, मिरवणुकीत डीजे, डॉल्बी, बँड अथवा लेझर लाईटचा वापर करण्यात आला नाही. शांतता, शिस्त आणि पारंपरिक संस्कृतीला प्राधान्य देत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीचे ग्रामस्थांनी कौतुक केले. व्यसनमुक्त व डीजेमुक्त गणेश विसर्जनाचा संदेश देत मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली.
पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक पार पाडण्यासाठी हिवरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप पाटील, बीट जमादार पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण जाधव, गुप्तवार्ता विभागाचे अंमलदार श्रीकांत चराटे व अमोल राऊत तसेच ग्रामपंचायत सदस्य हरिदास गव्हाणे यांनी मंडळाला मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संजय गव्हाणे, उपाध्यक्ष विवेक इंगळे यांच्यासह अनंता तोडेकर, आकाश चतारकर, मंगेश पारस्कार, भानुदास लांडे, चैतन्य राखोंडे, गजानन बुधळकर, राजेश्वर बुधळकर, शुभम देशमुख, नकुल देशमुख, संजय तिव्हाणे तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
पारंपरिक संस्कृतीचे जतन, शांततामय वातावरण आणि डीजेमुक्त विसर्जनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.

إرسال تعليق