रायफल शूटिंगमध्ये गुंजकर कॉलेजच्या  हर्ष बकालला सुवर्णपदक

खामगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर अँड गुंजकर कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजमधील बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी हर्ष बकाल याने रायफल शूटिंग (पिस्तूल शूटिंग) प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

१९ वर्षांखालील गटातील या स्पर्धेत हर्षने प्रथम क्रमांक मिळविला. त्याच्या या कामगिरीमुळे अमरावती येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. त्यामुळे हर्षच्या पुढील कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महल्ले यांच्या हस्ते झाला. यावेळी विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. हर्ष बकालच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर आणि संस्थेच्या सचिव प्रा. सुरेखा गुंजकर यांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच अमरावती येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. हर्षच्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post