घाटपुरी माता संस्थान परिसरात ‘जय हो ग्रुप’चे निःस्वार्थ स्वच्छता अभियान
खामगाव : धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपण्यासह स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी जय हो ग्रुप मित्र परिवाराच्या वतीने घाटपुरी येथील श्री जगदंबा माता संस्थान परिसरात निःस्वार्थ स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत संस्थान परिसराची स्वच्छता करून परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावातून हा उपक्रम राबविण्यात आला.
या स्वच्छता अभियानात संजयभाऊ तंबोले, बंडू भाऊ ससे, भिकचंद छापरवाल, कुलदीप ससे, दुर्गेश सारसर, विक्की सारवान, सचिन सारसर, विक्की ससे, मनोज काकाडे, पवन आठवले, विक्की आठवले, अनिल धेडुंदे, मुन्ना बहोनिया, गौरव छापरवाल, राम भगतजी पिवाल, खन्ना छापरवाल, अनिल तंबोले, संतोष पिवाल, रोहित तंबोले आणि सिद्धार्थ पवार यांच्यासह जय हो ग्रुप मित्र परिवारातील सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
‘स्वच्छता हीच सेवा, समाजसेवा हेच आमचे ध्येय’ हा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यातही सामाजिक व धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसह विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प जय हो ग्रुप मित्र परिवाराने व्यक्त केला. अशी माहिती विकी सारवान यांनी दिली

إرسال تعليق