आईवरील प्रेम, महादेवावरील श्रद्धा! १२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी बिहारच्या मोनू पँथरराज यांचा धावता प्रवास

खामगाव तालुक्यात शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख राजेंद्र बघे  भाऊ बिडकर, देवेश लोखंडकार यांनी केले स्वागत

खामगाव : आईवरील अपार प्रेम, भगवान महादेवावरील अढळ श्रद्धा आणि नवसपूर्तीसाठी घेतलेला संकल्प पूर्ण करण्याची जिद्द, यांचा अनोखा संगम बिहार येथील मोनू पँथरराज यांच्या प्रवासातून पाहायला मिळत आहे.

आईच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर भगवान महादेवाला केलेला नवस पूर्ण करण्यासाठी मोनू पँथरराज यांनी देशातील १२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचा संकल्प केला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी ते हजारो किलोमीटरचा प्रवास धावत करत आहेत. त्यांच्या या प्रवासादरम्यान ते खामगाव तालुक्यात दाखल झाले असता, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र रामदास बघे यांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले.यावेळीभाऊ बिडकर, देवेश लोखंडकार यांनी सुद्धा त्यांचा सत्कार केला.

आईच्या प्रकृतीसाठी मनोभावे केलेली प्रार्थना, महादेवावरील श्रद्धा आणि घेतलेला शब्द पूर्ण करण्याची जिद्द यामुळे मोनू पँथरराज यांचा हा प्रवास सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या या संकल्पामागील भावना आणि त्यासाठी घेतलेले कष्ट अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

आईवरील प्रेम आणि महादेवावरील श्रद्धा यांना संकल्पपूर्तीच्या जिद्दीची जोड मिळाल्याने मोनू पँथरराज यांचा हा प्रवास भक्ती, समर्पण आणि दृढनिश्चयाचा संदेश देणारा ठरत असल्याचे राजेंद्र बघे यांनी म्हटले आहे.


Post a Comment

أحدث أقدم