खामगावात २४ ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव
खामगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, खामगाव नगराच्या वतीने श्री विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथे करण्यात आले आहे. दुपारी ४. ४५ वाजता सर्व स्वयंसेवकांचे गणवेशात पथसंचलन निघणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.१५ वाजता मुख्य कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कालिदासजी थानवी (एम.डी. होमिओपॅथी, अध्यक्ष, मिशन ऑक्सिजन बहुउद्देशीय संस्था) उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह-संपर्क प्रमुख भारतभूषणजी मार्गदर्शन करणार आहेत.
विजयादशमी हा अधर्मावर धर्माचा, असत्यावर सत्याचा आणि अन्यायावर न्यायाचा विजय दर्शविणारा पर्व आहे. शौर्य, पराक्रम आणि शक्तीच्या उपासनेची प्रेरणा देणाऱ्या या पवित्र पर्वाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात विशेष महत्त्व आहे. विजयादशमीच्या शुभतिथीला संघकार्याचा शुभारंभ झाला. त्यामुळे हा उत्सव केवळ परंपरेचे प्रतीक नसून राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला नवचैतन्य आणि नवी प्रेरणा देणारा दिवस आहे.
पथसंचलन मार्ग............
शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक ४.४५ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर न. प. मैदान येथून प्रारंभ होईल त्यानंतर महाराजा मसाला, भारत कटपीस, अर्जुन जल मंदिर टर्न, भुसावळ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तानाजी व्यायामशाळेसमोरून टर्न, गणपती मंदिर, श्री पारिखजी यांच्या घरासमोरून, डॉ. छाजेड यांचा दवाखाना, मस्तान चौक, राणा गेट, पूरवार गल्ली, फरशी चौक, मोहन चौक, जगदंबा चौक, अग्रसेन चौक, शहर पोलीस स्टेशन टर्न, गुरुद्वारा असा राहणार असून, पथसंचलनाचा समारोप पुन्हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर न. प.मैदान येथे होणार आहे.
या विजयादशमी उत्सवाला स्वयंसेवकांनी सहपरिवार तथा खामगाव नगरातील मातृशक्ती व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खामगाव नगराचे संघचालक प्रल्हाद निमकंडे यांनी केले आहे.

إرسال تعليق