श्री जगदंबा (मोठी देवी) मातेचा उत्सव २५ ऑक्टोबर पासून


खामगाव-शहरातील श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळ (मोठी देवी) यांच्या वतीने जगदंबा रोड, महावीर चौक परिसरात श्री जगदंबा मातेचा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवांतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंडळाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, रविवार, २५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेला उत्सवाची स्थापना होणार आहे.' उत्सवातील सर्व दिवस सकाळी ७.३० तर सायंकाळी ८ वाजता मातेची आरती होणार आहे. त्यानंतर शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १ नोव्हेंबर रोजी सत्यनारायण प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तर सोमवार, २ नोव्हेंबर रोजी विसर्जन व मिरवणुकीने उत्सवाची सांगता होणार आहे

Post a Comment

Previous Post Next Post