लायन्स क्लब खामगाव तर्फे निःशुल्क रेटिनोपॅथी शिबिर संपन्न.

खामगाव - लायन्स क्लब खामगाव सेवा भावी संस्थे चा वतीने लायन्स आंतरराष्ट्रीय व्हिजन वीक 'लव्ह युअर आईस' अंतर्गत व अध्यक्ष लॉ. पिनेश कमानी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. राठोड आय हॉस्पिटल येथे निःशुल्क रेटिनोपॅथी तपासणी शिबिर घेण्यात आले. संपूर्ण लायन्स डिस्ट्रिक्टमधील हे एकमेव शिबिर होते.डॉ. संजीव राठोड, डॉ. सुरेखा मेंढे व डॉ. गौरव राठोड यांनी रुग्णांना डायबिटीक रेटिनोपॅथी, साखर नियंत्रण व आधुनिक उपचारांबाबत मार्गदर्शन केले.हे शिबिर ला लॉ. डॉ. अशोक बावस्कर, लॉ. डॉ. अशोक केला, लॉ. तेजस झांबड, लॉ. अमरजितसिंग बग्गा, सागर गुजर आदि लायन्स उपास्थीत  होते. कार्यक्रमात डॉ. संजीव राठोड यांच्या हस्ते अध्यक्ष लॉ. पिनेश कमानी यांना लायन पिन देऊन गौरविण्यात आले व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

अशी माहिती क्लब चे पी.आर.ओ. लॉ.कुलबिरसिंग पोपली व धर्मेश शाह यांनी दिली.

जाहिरात 


Post a Comment

Previous Post Next Post