नाशिक:- बस आणि
टँकरची धडक झाल्यानंतर बसने पेट घेतला.
या भीषण अपघातात १२
जणांचा जळून मृत्यू झाला असून ३८ प्रवाशी
गंभीररीत्या भाजले आहेत. आज पहाटे नाशिकच्या
संभाजीनगर रोडवर हॉटेल मिरची समोर ही
दुर्दैवी घटना घडली. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही
बस यवतमाळ वरून मुंबईकडे जात होती.
दरम्यान या अपघातात बुलडाणा जिल्ह्यातील
दोघींचा बळी गेल्याचे वृत्त आहे
. बिबी येथील लक्ष्मीबाई नागुराव
मुधोळकर (५०) व त्यांची नात कल्याणी
आकाश मुधोळकर (३) यांचा या अपघात
मृत्यू झाला आहे.

إرسال تعليق