आदरणीय_ज्ञानेश्वर_दादा_पाटील (नाना)
श्री गजानन महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या गणेश घराण्यात जन्म घेणं ही सोपी गोष्ट नाही
श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करता वेळी आपण अनेक भक्तांनी वै हरी कुकाजी पाटील यांच्या बद्दल माहिती वाचली असेल श्री महाराजांना जेव्हा एका भक्ताने नागपूर ला घेऊन जाऊन अटकाव केला.. तेव्हा वै. हरी कुकाजी पाटील श्रींना परत शेगांव ला आणण्यासाठी नागपूर ला गेले व हरी पाटलांना पाहून श्री गजानन महाराज... एखादी गाय जशी वासरा साठी धावते.. एखादी आई आपल्या बाळा साठी धावते. तसेच महाराज हरी पाटलांना पाहून त्यांना मिठी मारत म्हणाले मला शेगांव ला घेऊन चल. हरी कुकाजी पाटलां नंतर...
श्रींची शेगांव ते पंढरपूर पायदळ वारी ज्यांनी सूरू केली. श्री गजानन महाराज संस्थान चे व्यवस्थापकीय विश्वस्त
वै. पुरूषोत्तम हरी गणेश पाटील यांनी श्री गजानन महाराज संस्थान मधले पाणीही न पेता श्रींची निस्वार्थ सेवा केली व श्री गजानन महाराज संस्थान च्या नावाची पताका फक्त भारतातच नव्हे तर जगभरात फडकवली.
जगतगुरु तुकाराम महाराजांच्या अभंगा प्रमाणे
#शुद्ध_बीजा_पोटी_फळे_रसाळ_गोमटी_*
आता वै पुरूषोत्तम हरी गणेश पाटील यांचे चिरंजीव म्हणजेच आदरणीय *ज्ञानेश्वर दादा पाटील (नाना)* हे आपल्या वडिलांचा सेवेचा वारसा पुढे चालवत आहेत
गोर गरीब जनतेला होत असलेला त्रास व त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता फक्त निस्वार्थ सेवा या उद्देशाने *(शिव भावे जीव सेवा)* या ब्रीद वाक्याला अणूसरून त्यांनी *माऊली डायलिसिस व हार्ट केअर सेंटर* ची स्थापना केली जेथे गरजूंना सरकार च्या जिवनदाई योजने अंतर्गत उपचार देण्यात येते. डायलेसीस, बायपास, वॉल्व बदलने, ह्रदयात असलेले छीद्र भुजवने. अश्या मोठ मोठ्या शस्त्रक्रिया येथे महाराजांच्या कृपेने यशस्वी रित्या पार पडतात.
शिक्षणाचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पूणे सारख्या शहरात प्रत्येक विद्यार्थ्याला जाणे शक्य होत नाही... त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आदरणीय नानांनी "अ" दर्जा प्राप्त *माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयाची* स्थापना केली जेथे हजारो विद्यार्थी आज दर्जेदार शिक्षण घेतात. कित्येक गोर गरीब व गरजूंना आदरणीय नानांनी रोजगार उपलब्ध करून दिले.. व हे सगळ त्यांच्या घराण्याला असलेल्या श्रींच्या आशीर्वादाने होत आहे याची अनुभूती तुम्ही साक्षात घेऊ शकता... आदरणीय नानां भेटल्यावर माणूस कधी निराश होऊन परत जात नाही.. आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटावर येथे सामान्य माणसाला मार्ग मिळतो.
*आजही नाना रुग्णां मध्ये, गोर गरीबां मध्ये महाराजांना पाहून निस्वार्थ सेवा करत आहेत याची अनुभूती तुम्ही साक्षात घेऊ शकता...चला तर मग सज्ज व्हा एक अभुतपुर्व सोहळा अनुभवण्यासाठी.. नानांना भेट देण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी व जाणून घेण्यासाठी एक राजकारणा पलीकडचे व्यक्तीमत्त्व*
*आदरणीय ज्ञानेश्वर दादा पाटील नाना यांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच श्रीं चरणी प्रार्थना*


Post a Comment