खामगाव शहरातील रास गरबा प्रेमी नागरिकांसाठी

 *जेसीआय खामगाव जय अंबे च्या रास गरबा सीजन 03 उत्सवाचे थाटामाटात शुभारंभ*



 खामगाव शहरातील सर्व रास गरबा प्रेमी नागरिक ज्या रास गरबा उत्सवाची आतुरतेने वाट पाहत होते त्या बहु प्रतिक्षित जेसीआय खामगाव जय अंबे द्वारा आयोजित रास गरबा सीजन 03 उत्सवाचा उद्घाटन सोहळा कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर रविवारी दी. 9 ऑक्टोबर 2022 चे रात्री थाटामाटात संपन्न झाला

 

 सर्वप्रथम खामगावची आई मोठी देवी यांच्या तैलचित्राला हार घालून मनोभावे देवीची आरती करण्यात आली व त्यानंतर खामगाव चे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते फीत कापून भव्य आतिषबाजी करत रास गरबा मंडपाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आपल्या भाषणात बोलताना राणा दिलीपकुमार सानंदा यांनी रोषणाईने गजबजलेले गरबा मंडप व खामगावात पहिल्यांदाच आलेल्या साऊंड सिस्टम सह भव्य दिव्य आयोजनासाठी जेसीआय खामगाव जय अंबे ग्रुपचे कौतुक केले व पुढील आठ दिवसात होणाऱ्या रास गरबा उत्सव व प्रतियोगितां मध्ये  सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे  उत्साहवर्धन केले


 यावेळी मंचावर खामगावचे माजी नगराध्यक्ष  राणा अशोकसिंह सानंदा माजी नगराध्यक्षा श्रीमती अलकादेवी सानंदा माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले उद्योजिका जिगीषाजी पटेल जेसीआय खामगाव जय अंबे चे प्रणेते जेसी डॉ भगतसिंग राजपूत संस्थेचे अध्यक्ष जेसी एडवोकेट  रितेश निगम संस्थापक अध्यक्ष जेसी डॉ शालिनी राजपूत सचिव जेसी कौस्तुभ मोहता कोषाध्यक्ष जेसी नम्रता लाटे प्रोजेक्ट डायरेक्टर जेसी योगेश खत्री को प्रोजेक्ट डायरेक्टर जेसी सौरभ चांडक समन्वयक जेसी एडवोकेट  दिनेश वाधवाणी समन्वयक जेसी रोहन जैसवाल आदी मान्यवर उपस्थित होते 

   या भव्य जेसीआय खामगाव जय अंबे रास गरबा सीजन03 उत्सवाचे प्रोजेक्ट डायरेक्टर जेसी योगेश खत्री यांनी यावेळी पुढील आठ दिवसात होणाऱ्या

 इंडो वेस्टर्न थीम गरबा

 बॉलीवूड थीम कपल गरबा

  महाराष्ट्रीयन थीम गरबा

 प्रॉप्स गरबा

  फॅमिली थीम गरबा (आई वडील मुलं)

 ग्रुप गरबा (कमीत कमी 4 मेंबर)

 प्रिन्स व प्रिन्सेस स्पर्धा

 तसेच दररोज बेस्ट ड्रेस अप (मेल/फिमेल) या प्रतियोगिता बद्दल  तसेच स्पर्धेतील विजेत्यांना सिस्का ॲक्सेसरीज तर्फे एक लाख पन्नास हजार रुपयांहुन अधिक ची बक्षिसे देण्यात येणार आहे याबद्दल मार्गदर्शन केले व तसेच खामगाव शहरातील व परिसरातील सर्व प्रतियोगिता मध्ये भाग घेता येऊ शकणाऱ्या स्पर्धकांना रास गरबा प्रेमी नागरिकांना या उत्सवात रोज संध्याकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत नगरपरिषद शाळा क्रमांक 6 च्या प्रांगणात सहभागी व्हावे असे आवाहन केले

Post a Comment

Previous Post Next Post