नि:शुल्क त्वचारोग तपासणी शिबिर”


रोटरी क्लब खामगांवद्वारे “नि:शुल्क त्वचारोग तपासणी शिबिराचे आयोजन”



मानवी त्वचेच्या अनेक समस्या असतात की ज्यांचे निदान लौकर होत नाही जसे की पांढरे डाग व चट्टे, त्वचेवरील अॅलर्जी, गुप्तरोग, कुष्ठरोग, केमिकल पिलिंग, चेह-यावरील वांग, केस विकार, त्वचेचे शुष्क होणे, अनावश्यक केसांची वाढ होणे इत्यादी. त्यांचेच निदान करण्यासाठी यंदा रोटरी क्लब खामगांवने “नि:शुल्क त्वचारोग तपासणी शिबिराचे आयोजन” केलेले आहे. हे आयोजन गुरुवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ०९ ते सायंकाळी ०४ वाजेपर्यंत अग्रसेन भवन, बालाजी प्लॉट, खामगांव येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबिरात दिल्ली एम्स (AIIMS) मधुन प्रशिक्षित आणि सध्या खामगांव येथेच कार्यरत असलेले डॉ प्रतिक मोहता आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ सौ ईशा मोहता (दोघेही त्वचारोग, गुप्तरोग व सौंदर्यतज्ञ) हे तज्ञ डॉक्टर्स नि:शुल्क तपासणी करतील आणि योग्य त्या औषधोपचाराबाबत मोफत सल्ला देतील.  सदर शिबिराच्या अधिक माहितीसाठी प्रकल्पप्रमुख रो विनय मोह्नानी (मोबाईल क्रमांक ९४२०५५५८८८) किंवा रोटरी क्लब सचिव रो रितेश केडिया (मोबाईल क्रमांक ९८५०३९५०९७) किंवा रोटरी क्लब अध्यक्ष रो आलोक सकळकळे (मोबाईल क्रमांक ९४२२१८३०४२) यांचेशी संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त संख्येने लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब अध्यक्ष रो आलोक सकळकळे, रोटरी क्लब सचिव रो रितेश केडिया व प्रकल्पप्रमुख रो विनय मोह्नानी यांनी केलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post