तेज फाउंडेशनच्या चतुर्थ वर्धापनदिनानिमित्त आदिवासी आश्रमशाळेत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करून साजरा.
खामगाव:- तेज मल्तिपर्पज फाउंडेशन सामाजिक संस्थेचे चार वर्षा पासून विविध सेवा प्रकल्प नेहमी चालू असते आणि गरजू लोकांना लाभ मिळत असते.संस्थे चे संस्थापक अध्यक्ष,युवा भूषण अंतरराष्ट्रीय समाजसेवी व उधोजक तेजस प्रकाशचंद झांबड यांचा मार्गदर्शनात संस्थे चे सेवा कार्य चालू असते तसेच या चार वर्षात संस्थेद्वारा विविध सेवा प्रकल्प राबविण्यात आले त्यात महिला कायदा व सुरक्षा मार्गदर्शन शिबीर, रक्त्त दान, ऑनलाईन संगणक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले आणि शासकीय विभाग साठी राष्ट्रीय स्तरिय ऑनलाईन गायन कार्यक्रम,शारीरिक तपासणी शिबीर,वृक्षारोपण आदि सेवा कार्य या चार वर्षांत संस्थेद्वारा झाले आणि विशेष हे सर्व प्रकल्प नि:शुल्क आयोजित करण्यात आले होते.तेज फाउंडेशन च्या चतुर्थ वर्धापनदिनानिमित्त सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळा सजनपुरी तालुका खामगांव येथे ऑटो रेफ अत्यधुनिक मशीन द्वारे नेत्र तपासणी शिबीर आयोजित करून शाळे चे शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे तपासणी करण्यात आली त्यात प्रमुख उपातिथित सुचित श्रीराम राठोड मुख्याध्यापक व संस्थे चे संस्थापक अध्यक्ष तेजस प्रकाशचंद झांबड हे होते.या शिबीरात विद्यार्थ्यांचे, शिक्षक,शिक्षिका असे जवळ पास ७० जणांची तपासणी श्री हास्पिटल चे डॉ मुकेश नाये व त्यांचे समूहांनी केली.या शिबीरात शिक्षक गोवर्धन टिकार, विनोद देशमुख,विश्वजीत अवचार,व शिक्षिका पुनम उपर्वट,वैशाली भोपळे,छाया ठोसर आदींची उपस्तीथी होती व या नेत्र तपासणी शिबीर आयोजित केल्याने तेजस झांबड यांना शाळे चा वतीने आभार पत्र देण्यात आले व शिबीर यशस्वी संपन्न झाले.

Post a Comment