*
खामगाव(नितेश मानकर)
भव्य दांडीया रास गरबा च्या आयोजनासाठी खामगाव शहरात सर्व परिचित असलेल्या जेसीआय खामगाव जयअंबे या सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठी देवी उत्सवात भव्य दांडीया रास गरबा सीजन 03 चे आयोजन नगरपरिषद शाळा क्रमांक 6 च्या प्रांगणात रविवार दिनांक 9 ऑक्टोंबर 2022 ते 16 ऑक्टोबर 2022 पर्यंत रोज संध्याकाळी 06.00 वाजेपासून ते 10.00 वाजेपर्यंत करण्यात आलेले आहे. या रास गरबा उत्सवात येणाऱ्या सर्व प्रेक्षकांकरिता बसण्याची आसन तसेच स्वादिष्ट व्यंजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे
या जेसीआय खामगाव जय अंबे रास गरबा सिजन 03 उत्सवात दररोज विविध प्रकारची प्रतियोगिता आयोजित करण्यात येत असून यात प्रामुख्याने
10 ऑक्टोबर रोजी इंडो वेस्टर्न थीम गरबा
11 ऑक्टोबर रोजी बॉलीवूड थीम कपल गरबा
12 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रीयन थीम गरबा
13 ऑक्टोंबर रोजी प्रॉप्स गरबा
14 ऑक्टोंबर रोजी फॅमिली थीम गरबा (आई वडील मुलं)
१५ ऑक्टोबर रोजी ग्रुप गरबा (कमीत कमी 4 मेंबर)
16 ऑक्टोंबर रोजी प्रिन्स व प्रिन्सेस स्पर्धा
तसेच दररोज बेस्ट ड्रेस अप (मेल/फिमेल) या सर्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या सर्व स्पर्धेतील विजेत्यांना सिस्का ॲक्सेसरीज तर्फे एक लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक ची बक्षिसे देण्यात येणार आहे.
या जेसीआय जयअंबे तर्फे आयोजित स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता रजिस्ट्रेशन आवश्यक असून रास गरबा मध्ये खेळण्याकरिता तसेच पाहण्यासाठी पासची व्यवस्था करण्यात आलेली आहे.या रास गरबा उत्सवासंबंधित आपल्याला अधिक माहिती पाहिजे असल्यास आपण
संस्थेचे प्रणेते जेसी डॉ भगतसिंग राजपूत 9850956495
संस्थेचे अध्यक्ष जेसी अँड. रितेश निगम 70 3006 3007
रास गरबा उत्सव चे प्रोजेक्ट डायरेक्टर जेसी योगेश खत्री 9890725000
को प्रोजेक्ट डायरेक्टर जेसी सौरभ चांडक 9405476888
को प्रोजेक्ट डायरेक्टर एडवोकेट दिनेश वाधवाणी 9326094440
या सर्वांशी संपर्क साधून लवकरात लवकर आपले रजिस्ट्रेशन करून घ्यावे तसेच एन्ट्री पासेस आजच घेऊन आपली ऐनवेळी होणारी गैरसोय टाळावी असे आवाहन जेसीआय खामगाव जयअंबे संस्थेतर्फे करण्यात आलेली आहे अशी माहिती जेसी रोहन जयस्वाल (9822694440) यांनी दिली

Post a Comment