बातमी साठी संपर्क -नितेश मानकर, खामगाव 8208819438
रोटरी क्लब खामगांवद्वारे “नि:शुल्क मोतीबिंदु तपासणी शिबीर संपन्न”
मानवी डोळ्यांच्या अनेक समस्यांचे निदान करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही रोटरी क्लब खामगांव आणि विदर्भातील सर्वात मोठे नेत्र रुग्णालय दमाणी नेत्र रुग्णालय अकोला यांनी संयुक्तपणे “नि:शुल्क मोतीबिंदु तपासणी शिबीर” आयोजित केले होते. सदर आयोजन सोमवार दिनांक १० ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ०३ वाजेपर्यंत अग्रसेन भवन, बालाजी प्लॉट, खामगांव येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात दमाणी नेत्र रुग्णालय अकोला येथील तज्ञ डॉक्टर्स डॉ आशिष परहाते आणि त्यांचे सहकारी श्री अजय देशमुख तसेच स्थानिक सिल्व्हरसिटीचे डॉ गौरव गोएनका, डॉ आनंद राठी, डॉ पूजा कांडेलकर व त्यांचे सहकारी कु कोमल लोन्ढे (सिस्टर) यांनी सुमारे ११६ रुग्णांची तपासणी केली आणि शस्त्रक्रियेसाठी ४२ रुग्णांची निवड केली आहे. त्यांना पुढील तारीख देऊन त्यांची अकोला येथे नाममात्र ३००/- रुपयात शस्त्रक्रिया करण्यात येईल. उल्लेखनीय बाब हि आहे की शस्त्रक्रियेसाठी ज्या ४२ रुग्णांची निवड झालेली आहे त्यांचा सर्व खर्च दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री उत्तमचंदजी गोएनका हे प्रायोजित करणार आहेत. सिल्व्हरसिटीच्या चमूने याठिकाणी सर्व रुग्णांसाठी NCD कॅम्पचे देखील आयोजन केले होते. रोटरीचे प्रांतपाल डॉ आनंद झुनझुनुवाला यांनी या शिबिरास भेट दिल्यामुळे एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. सदर शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रकल्पप्रमुख रो पंकज अग्रवाल, रो विजय पटेल, सह-प्रकल्पप्रमुख रो रोहित गोयनका, रो परमानंद नागराणी, रो कमल सोनी, रो किशन मोहता, रो अतुल अग्रवाल, संजय अग्रवाल, रो सुरेश पारीक, रो आनंद शर्मा, रो मुकुंद मोटवानी, रो प्रतिक जैस्वाल, रो राजेश पाडिया यांनी अथक परिश्रम घेतले तर रो प्रमोद अग्रवाल, रो देवेश भगत, विजय शर्मा यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. रोटरी क्लब अध्यक्ष रो आलोक सकळकळे व रोटरी क्लब सचिव रो रितेश केडिया यांनी मदत केल्याबद्दल क्लब तर्फे सर्वांप्रती आभार व्यक्त केलेले आहेत.

إرسال تعليق