*खामगाव येथे रा.स्व. संघाचा आज विजयादशमी उत्सव* खामगाव: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, खामगाव शाखेच्यावतीने शनिवार,
दि. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता अरजण खिमजी नॅशनल हायस्कूलच्या मैदानावर विजयादशमी उत्सव आयोजित केला आहे. या उत्सवासाठी *प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य राम माधव मार्गदर्शन करणार आहेत.* यावेळी अतिथी म्हणून डॉ. आनंद राठी उपस्थित राहतील. विजयादशमी उत्सवापूर्वी अरजण खिमजी नॅशनल हायस्कूल मैदानावरून पथसंचलन संघाचे निघेल. ४.४० वाजता पथसंचलनाची सांगता होणार आहे. ऐनवेळी पाऊस आल्यास विजयादशमी उत्सव देवजी खिमजी मंगल कार्यालयात होईल. उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन नगर संघचालक प्रल्हाद निमकंडे यांनी केले आहे.
...


Post a Comment