खामगाव(नितेश मानकर/निलेश देवताळू)
आई राधा उदो उदो च्या गजरात खामगाव येथे शांती उत्सवाला संध्याकाळी 7 वाजता मातेच्या आरतीने सुरुवात झाली आहे
देशात फक्त खामगावात साजरा होणाऱ्या श्री जगदंबा देवीच्या शांती उत्सवाला यंदा ९ ऑक्टॉम्बर म्हणजेच आज कोजागिरी पोर्णिमेपासून प्रारंभ झाला आहे.
श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळ (मोठी देवी) तर्फे जगदंबा देवीची ९ ऑक्टोबर रोजी विधीवत पुजाअर्चा करुन सायंकाळी ७ वाजता स्थापना करण्यात आली.
या उत्सवासाठी शहरातील मंडळांतर्फे मंडप, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जगदंबा चौकातील जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे बसविण्यात जागृत मूर्ती मोठी देवी म्हणून सर्वदूर ओळखली जाते.
या देवीला ११४ वर्षाची परंपरा असून नेताजी मंडळाकडून अन्न छत्राची निर्मिती करण्यात आली आहे तर दररोज 12 ते 4 या वेळेत महाप्रसाद भाविकांना मिळणार आहे

Post a Comment