पतीचे दुसऱ्या तरुणीसह अनैतिक संबंध असल्याच्या संशयातातून एका महिलेने बहिण आणि मैत्रिणीच्या मदतीने किशोरवयीन मुलीची हत्या केल्याची धक्कदायक घटना कुर्ला येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी तिघी आरोपी महिलांना अटक केली आहे. मीनल पवार, शिल्पा आणि प्रज्ञा भालेराव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे आहेत.
काय आहे नेमकी घटना
मीनलच्या पतीचे मयत मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. मीनलने मुलीला पतीपासून दूर राहण्याबाबत अनेक वेळा समज दिली. मात्र ही मुलगी मीनलच्या पतीला भेटतच होती. यामुळे मीनलचा राग अनावर झाला आणि मीनल, तिची बहिण शिल्पा आणि मैत्रिण प्रज्ञा भालेराव या तिघीही बुधवारी दुपारी मुलीला भेटल्या. तिघींनीही मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलीने त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे तिघींनी तिची हत्या केली.
हत्या केल्यानंतर मुलीचा मृतदेह प्लॅस्टिक बॅगेत भरुन गटारात फेकून दिला. पोलिसांनी आरोपींनी दिलेल्या माहितीवरुन गटारातून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
आरोपींना अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिघींवर हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment