"छात्रशक्ती हीच राष्ट्रशक्ती मानणारं एकमेव संघटन म्हणजे अभाविप-रामेश्वरजी घोराळे"
खामगांव - स्थानिक माधव सदन येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद खामगाव च्या वतीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्थापना दिवस राष्ट्रीय विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला या समारोहास प्रमुख वक्ते म्हणून अभाविपचे पूर्व कार्यकर्ते लोकतंत्र सेनानी संघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष रामेश्वरजी घोराळे जेष्ठ स्वयंसेवक समाधानजी खराटे जिल्हाप्रमुख गणेश घोराळे, नगर मंत्री ऋषिकेश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी प्रमुख वक्ते रामेश्वरजी घोराळे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना 1949 साली झाली. छात्रशक्ती हीच राष्ट्रशक्ती मानून सर्व युवकांमध्ये देशभक्ती जागृत करून या देशाला परम वैभवास्थानी नेण्यासाठी युवकांमध्ये हुंकार भरून गलिच्छ राजकारणावर अंकुश ठेवण्याचे कार्य अभाविप करत आहे.आणीबाणीच्या काळात असंख्य तरुणांनी अभाविपच्या प्रेरणेतूनच सत्याग्रहात सक्रिय सहभाग घेतला.आज 75 वा स्थापना दिवस अभाविप साजरा करित आहे.अभाविपचे पन्नास लाखाहून अधिक सक्रिय सदस्य आहेत. या राष्ट्रीय विद्यार्थी दिवसाचे औचित्य साधून अनेक राष्ट्रभक्तांनकडुन प्रेरणा घेऊन कार्यकर्त्यांनी देश सेवा करावी असे आवाहन रामेश्वरजी घोराळे यांनी केले.
यावेळी गणेश कठाळे,प्रथमेश कोहळे, आनंद निकाळजे, प्रेम करवते, अथर्व शिरसुले , भुषण रोतले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी सरस्वती माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रास्ताविक गणेश घोराळे, संचालन अनिकेत वरूडकर, आभार प्रदर्शन रुषिकेश वाघमारे यांनी केले.


Post a Comment