गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तथा सामाजिक सुसंवाद समारंभाचे आयोजन
साखरखेर्डा lप्रतिनिधी -
दरवर्षी कॉपीमुक्त कार्यशाळा असो की, महाप्रलयामध्ये संकटात सापडलेल्या पुरग्रस्तांना मदत असो कि, निराश्रितांसाठी मदत असो असे विविध सामाजिक उपक्रम विदर्भ न्याय परिवार राबवित असतो. नुकताच उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार तथा सामाजिक करण्यात आले आहे. सदर सामाजिक सुसंवाद समारंभाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष शांतीदूत जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने हेभूषविणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून
शिवाचार्य रत्न सिध्दलिंग शिवाचार्य महाराज, सद्गुरू सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज मठाधिपती, पलसिद्ध मठ साखरखेर्डा
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष
मा. डॉ. बाळासाहेब गावडे सिनेट सदस्य अमरावती विद्यापीठ हे आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून
मुकुंद दंडे, बाबुराव महामुनी अपर पो. अधीक्षक बुलडाणा, प्रदीप पाटील उपविभा. पो.अधि. मेहकर
समाधान गायकवाड उपविभागीय महसूल अधि. सिं. राजा
अजीम नवाज राही प्रख्यात कवी,
अनिल म्हस्के प्रदेशाध्यक्ष व्हाईस ऑफ मिडिया, विनोद बोरे प्रदेशाध्यक्ष व्हाईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंग, लक्ष्मीकांत बगाडे जिल्हाध्यक्ष व्हाईस ऑफ मिडिया, भोजराज गाडेकर संपादक, विदर्भ न्याय, राजेंद्र काटे संचालक पलसिध्द कंट्रक्शन, सौ. सुमनताई सुनिल जगताप सरपंच साखरखेर्डा,
भदंत गुणरथीत महाथेरो,ओमसेठ अग्रवाल , असलम अंजूम मो बशीर जिल्हा सदस्य शांतता समिती, शिवशंकर डुकरे संचालक, मॅथ कोचिंग क्लासेस, चंद्रशेखर शुक्ल, सचिव एस. ई. एस. ज्यु. कॉलेज डॉ. निलम महाजन अध्यक्ष, शिवाजी हाय. सा. खेर्डा , किशोर महाजन संचालक बुलडाणा अर्बन, रमेश ठोसरे, अर्जुनराव गवई संस्थाध्यक्ष, अनिकेत सैनिक स्कूल, मौलाना रज्जब अली खान, प्रकाश इंगळे प्राचार्य, सहकार विद्या मंदिर सा. खेर्डा, मो. आरिफ मो. शफी मुख्याध्यापक उर्दू हायस्कूल, सुनिल देशमाने मुख्याध्यापक श्री शिवाजी हायस्कूल, मधुकर भगत प्राचार्य एस ई एस ज्यु कॉलेज यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांना अरबी आणि उर्दु भाषेसह कुराणाचा दांडगा अभ्यास आहेहत्यामुळे संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साखरखेर्डा शहरात सामाजिक एकोप्याला नवे बळ देण्याचा ते प्रयत्न करणार आहे.
यावेळी दहावी आणि नीटमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून पर्यावरण तथा जातिय सलोख्याचा संदेश दिला जाणार आहे. यामध्ये सर्व शाळा, कॉलेज सहभागी होणार असून व्हाईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंग बुलडाणा तथा विदर्भ न्यायच्या वतीने सदर भव्य दिव्य कार्यक्रम दि 20 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता पलसिध्द महास्वामी पिठाच्या प्रशस्त सभागृहात पार पडणार असल्याची माहिती व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष संतोष गाडेकर यांनी दिली आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.


Post a Comment