श्री.अरजण खिमजी नॅशनल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या

प्राचार्या डॉ.सौ. प्रविणा शहा यांना वुमन्स अचिव्हर्स अवार्ड 

अकोला जनोपचार न्यूज नेटवर्क:- लोकमत तर्फे बुलडाणा-अकोला-वाशिम या तीन जिल्ह्यातील कर्तुत्ववान ४०महिलांची निवड करण्यात आली. त्यातील स्थानिक श्री. अरजण खिमजी नॅशनलहायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. प्रविणा प्रमोद शहा यांची लोकमत वुमन्स अचिव्हर्स अवार्ड २०२३ चा पुरस्कार देण्यात आला. 


त्यांच्या मार्गदर्शनाखालीकनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक शालांत परीक्षेचा उत्कृष्ठ निकाल लागला आहे. अनेकसामाजिक संस्थांसोबत त्या निगडीत असून त्यांचे सामाजिक कार्य वाखाणण्यासारखे आहे.त्यांनी समाजामध्ये सुद्धा चांगली कार्य सुद्धा केले आहे. त्यामुळेच त्यांना लोकमत तर्फेवुमन्स अचिव्हर्स अवार्ड २०२३ चा पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे कौतुक अध्यक्ष प्रविण चोपडा, उपाध्यक्ष अल्पेश पटेल, सचिव जितेश टिंबाडीया,उपमुख्याध्यापक दिगंबर, सर्व पर्यवेक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीयांनी सुद्धा केले. सर्व विद्यार्थ्यांच्यासमोर प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला आहे आणित्यांचे भरपुर कौतुक करण्यात आले आहे. त्यांच्या भावी वाटचालिस हार्दिक शुभेच्छा !

Post a Comment

Previous Post Next Post