मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड मध्ये आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल्स

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- स्थानिक घाटपुरी नाका परिसरातील आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलंपियाड या परीक्षेत भरघोस यश मिळवत पहिल्या लेवल मध्ये  तब्बल 18 गोल्ड मेडल्स मिळवलेले आहेत. मागील वर्षी सुद्धा आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सायन्स, गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान या विषयावर आधारित ओलंपियाड परीक्षेत 17 गोल्ड मेडल्स पटकाविले होते.

जाहिरात

 यावर्षी यशाची परंपरा कायम राखत, पौरवी पांडव, जस्मित कौर सिंग, ओवी हिरोडकर, प्रसाद भारसाकडे, श्रद्धा चोपडे, शौर्य दीक्षित, आनंदी घट्टे, शिवानी रोहणकार, वेदांत मोहोळ, अर्णव परदेशी, श्रीकांत अवचार, गौरी फाटकर, मानवी लकडे, दिव्या झापर्डे, मोक्षदा टिकार, गिरीराज कुसुंबे, श्रावणी भावसार, अंश होलवनकर या अठरा विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल, सर्टिफिकेट, एक्सलन्स परफॉर्मन्स रिपोर्ट देऊन शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांदेखत गौरविण्यात आले. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकरिता शाळेतच एक स्वतंत्र क्लास घेऊन तयारी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी अतिशय कठोर मेहनत घेऊन या परीक्षेत यश संपादन केले. 

Advt.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पळसकर, जेष्ठ शिक्षिका ममता महाजन, प्रियंका राजपूत, ज्योती वैराळे, माधुरी उगले, अश्विनी देशमुख, कल्पना कस्तुरे, अलका वेरूळकर, दामिनी चोपडे, प्रिया देशमुख, सारिका सरदेशमुख, निशा खंबाईतकर, संगीता इंगळे, प्रियंका वाडेकर, विजया पोकळे , अश्विनी वक्ते, कोमल आकणकर, सपना हजारे,वंदना गावंडे, संगीता पिवळटकर, सुवर्णा वळोदे, राजकन्या वडोदे, प्रतिभा गावंडे उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم