श्री नवयुवक मानाची कावड यात्रा वतीने महाशिवरात्रीनिमीत्त नागझरी येथून पवित्र जल आणून श्री महादेवाला जलाभिषेक
सायंकाळी भव्य शोभायात्रा आणि महाआरतीचे आयोजन
खामगांव :- खामगांव शहरातील श्री नवयुवक मानाची कावड यात्रा वतीने आज सकाळी महाशिवरात्री निमीत्त श्रीक्षेत्र नागझरी येथून पवित्र जल आणून खामगांव शहरातील मुख्य पाच श्री महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यात आला. हे पवित्र जल आणण्याकरीता श्री नवयुवक मानाची कावड यात्रेचे संस्थापक अध्यक्ष राहुल कळमकार यांचे नेतृत्वाखाली विक्की धारपवार, आदित्य उपाध्याय, अमोल धारपवार, राहुल नाटेकर, रूद्राक्ष कळमकार, संकेत भारसाकळे, दिपक काळवणे, विक्की जिंजूळकर, लखन वानखडे, गोपाल धारपवार, विजय गंगतिरे, निलेश गावंडे, विनोद गवई, बबन वानखडे हे कावडधारी गेले होते. आज दुपारी श्री हनुमान मंदिर, राठी प्लॉट येथे महाप्रसाद (ऊसळ व दुध) यांचे भावीकांना वाटप करण्यात येणार आहे.
तसेच आज सायंकाळी ५.३० वाजता दालफैल, राठी प्लॉट भागातील श्री महादेव मंदिरात खा. प्रतापराव जाधव, आ. अॅड. आकाशदादा फुंडकर , आ. संजय गायकवाड, अॅड. अमोलभाऊ अंधारे, विठ्ठलभाऊ लोखंडकार, नगरसेवक राकेश राणा, राज देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती व पुजन करण्यात येवून शोभायात्रेला सुरूवात होणार आहे. ही शोभायात्रा दाळ फैल, राणा गेट, फरशी, सुटाळपुरा, महाकाल चौक या भागातून जाणार असून स्मशानभुमी येथे शोभायात्रेचा समारोप होणार आहे. त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते नंदलाल भट्टड व मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या हस्ते महाआरती व जलाभिषेक करण्यात येणार आहे
तरी या सर्व कार्यक्रमांना शिवभक्त आणि महिला भगीनींनी मोठ्या संख्येने सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन श्री नवयुवक मानाची कावड यात्रा चे संस्थापक अध्यक्ष राहुल कळमकार यांनी केले आहे.


إرسال تعليق