अतिशय गुंतागुंतीची शस्रक्रिया सिल्व्हरसिटी मल्टीस्पेशिअलीटी हॉस्पिटलला यशस्वी
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क ,:-दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी जळगाव वरून आसलगाव कडे जात असताना महाराष्ट्र बँकेसमोर दुचाकीला ट्रकने धडक दिल्यामुळे अपघात घडला, रुग्ण नामे वासुदेव सोनोने याला रुग्णवाहिकेद्वारे दुपारी तीन वाजेच्या दरम्यान सिल्वर सिटी हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता आणण्यात आले.
![]() |
| डॉ. राजपूत डॉ. गोयनका व सिल्वरसिटी ची टीम |
त्याच्या डाव्या पायाला गंभीर इजा होऊन रक्तपुरवठा खंडित झालेला होता डॉ. भगतसिंग राजपूत यांनी रुग्णाची तपासणी केल्यानंतर गुडघ्यापासून पाय कापण्याचा सल्ला दिला त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांच्या संमतीने रुग्णाला पुढील उपचाराकरिता आयसीयू मध्ये तातडीने भरती करण्यात आले व उपचारादरम्यान हृदय विकाराचा झटका
![]() |
| खामगाव करिता जाहिरात फक्त १०० रुपयात संपर्क ९४२२८८३८०२:: ८२०७८१९४३८ |
त्यातून रुग्ण सावरत असतांना उजवी बाजूला अर्धांग वायु चा झटका आला. हे थोडके होते की किडनी निकामी झाली. रक्त दाब कमी जास्त व्हायला लागला व रुग्ण अतिशय गंभीर परिस्थितीत पोहोचला. अशा गंभीर परिस्थितीत सुद्धा रुग्णांच्या नातेवाईकांनी सिल्वर सिटी रुग्णालयातील डॉक्टरांवर विश्वास ठेऊन उपचार सुरू ठेवले. हळूहळू रुग्ण अवषधोपचारास प्रतिसाद द्यायला लागला व अनुभवी डॉ. अशोक बावस्कर डॉ. भगतसिंग राजपूत डॉ. गौरव गोयंका डॉ. अयान हुसेन व सर्व कर्मचारी वृंद यांनी शर्तीचे प्रयत्न करून रुग्णास यशस्वीपणे यातून बाहेर काढले व रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी डॉ. भगतसिंग राजपूत यांनी त्याच्या निर्जीव डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून गुडघ्यापासून तो कापण्यात आला व रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी डिस्वार्ज देण्यात आला.
त्यानंतर दोन दिवसांनी रुग्णांच्या नातेवाईकांकडने अशी माहिती मिळाली की त्यांच्या गावामध्ये ड्रेसिंग करायला कोणीही डॉक्टर नाही जेव्हा की पेशंटला एक दिवस आड ड्रेसिंग करणे गरजेचे होते मग हॉस्पिटलने निर्णय घेऊन त्यांना येथे परत बोलवून घेतले व तेव्हापासून ते आजतागयत रुग्ण व त्याच्याबरोबर एक नातेवाईक हॉस्पिटलमध्येच आहेत त्यांची नियमित तपासणी होते परंतु कुठलाही डॉक्टर त्याची फीस घेत नाही.


إرسال تعليق