खामगाव नगरपरिषद मध्ये ईडीपी ट्रेनिंग
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- Day-Nulm अंतर्गत दिनांक 0४ मार्च ते ०६ मार्च या कालावधीत EDP ट्रेनिंग खामगाव नगर परिषद मध्ये देण्यात आले. सदर कार्यक्रम हा टीम फाउंडेशन नाशिक या टीमचे तज्ञ समन्वयक संघपाल वाहुळकर तसेच उद्घाटक मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्वयंरोजगार व शहर स्तर संघातील सदस्यांसाठी ३ दिवशीय edp कार्यक्रम घेण्यात आला.


إرسال تعليق