श्री नवयुवक  मानाची कावड यात्रा वतीने महाशिवरात्रीनिमीत्त  विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

 महिला भगीनीच करणार सर्व कार्यक्रमांचे सारथ्य

खामगांव :-  खामगांव शहरातील  श्री  नवयुवक मानाची कावड यात्रा वतीने  दरवर्षी महाशिवरात्री निमीत्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याच प्रमाणे यंदा देखील  महाशिवरात्रीला  विविध धार्मिक  कार्यक्रमांचे आयोजन  श्री  नवयुवक मानाची कावड यात्रा संस्थापक  राहुल कळमकार यांच्या नेतृत्वात  करण्यात आले आहे. 

जाहिरात

विशेष म्हणजे या वर्षी सर्व कार्यक्रमांंकरीता  महिला भगीनी पुढे आल्या असून  या महिला व्दारे होणार्‍या  कार्यक्रमांकरीता  प्रमुख मार्गदर्शक  सौ.  सुलोचनाकाकू  सुलताने यांचे  विशेष उपस्थितीत कार्यक्रम   प्रमुखांची निवड ही  इश्वरचिठ्ठीने करण्यात आली.  इश्वरचिठ्ठी  राहुल कळमकार, गजानन महाराज संस्थानचे  अध्यक्ष राजभाऊ देशमुख व  प्रतिष्ठित नागरीक विशाल  मगर यांचे उपस्थितीत श्री संत गजानन महाराज मंदिर , दाल फैल खामगांव येथे   काढण्यात आली.  यामध्ये  अध्यक्ष म्हणून सौ. संगीताताई  शिराळ  यांची निवड करण्यात आली असून  उपाध्यक्ष - सौ. राजश्रीताई  चव्हाण, सचिव - श्रीमती कळींकर काकू , सहसचिव - कु. प्राचीताई खोपाले, सल्लागार - सौ. अनिताबाई निमकर्डे,  कोषाध्यक्ष म्हणून श्रीमती उषाताई मगर, सदस्य - श्रीमती अलकाताई मोरे, श्रीमती प्रमिलाताई मोरे, श्रीमती छायाताई कोरकणे यांची निवड करण्यात आली. 



महाशिवरात्री  दिनी दि. ०८.०३.२०२४  रोजी सकाळी  ९ ते १२ या वेळेत  राठी प्लॉट भागातील  श्री हनुमान मंदिर परिसरात असलेल्या  श्री महादेवाला  जल आणि दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे तर  दुपारी १२ ते ३  या वेळेच महाप्रसाद म्हणून  उसळ आणि दुधाचे वाटप करण्यात येणार असून  दुपारी ३ ते ६ या वेळेत शिव मंदिरात  महिला मंडळाचे वतीने भजनाचा कार्यक्रम होणार असून  सायंकाळी ६ वाजता खामगांव शहरातील विविध मार्गाने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.  या मिरवणूक विशेष आकर्षण म्हणून  भगवान शिव यांचे  स्वरूप  नांदुरा येथील निल कल्याणकर हे धारण करणार असून  माँ पार्वती म्हणून कु. साक्षी  कुटे , खामगांव   ही असणार आहे तसेच  भव्य देखावा देखील उभारण्यात येणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांना शिवभक्त आणि महिला भगीनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री नवयुवक मानाची कावड यात्रा चे संस्थापक अध्यक्ष राहुल कळमकार यांनी केले आहे. 

-

Post a Comment

أحدث أقدم