आदर्श ज्ञानपीठ मध्ये पल्स पोलिओ लसीकरण शिबीर संपन्न
खामगाव:- घाटपुरी नाका परिसरातील आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल खामगाव येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने " दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओ वर विजय दरवेळी " हे घोषवाक्य घेऊन आदर्श ज्ञानपीठ येथे पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली .
शाळेत पाच वर्षाखालील परिसरातील बालकांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना पोलिओची लस देण्यात आली. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये आरोग्य विभागासोबतच आदर्श ज्ञानपीठ यांनी सुद्धा पाच वर्षापर्यंतचा एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष सहभाग नोंदवला. आरोग्य विभागाच्या या मोहिमेअंतर्गत राज्यातील पाच वर्षाखालील 1 कोटी 13 लाख 70 हजार 443 बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.



Post a Comment