निशुल्क बाल संस्कार शिबिर संपन्न

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-ब्रह्मा कुमारीज खामगाव सेवा केंद्राच्या वतीने पाच दिवसीय निशुल्क बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ब्रह्माकुमारीच्या रायगड कॉलनी शिवालय या भावनांमध्ये 9 ते 12 या वयोगटातील विद्यार्थी सकाळी 9 ते 11 व वयोगट 13 ते 16 हे विद्यार्थी सायंकाळी 5 ते 7 या दोन बॅचमध्ये हे शिबिर पार पडले या शिबिरामध्ये शारीरिक स्वास्थ्यासाठी एक्सरसाइज तसेच अभ्यासात एकाग्रता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या वयोगटातील विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने राजयोग मेडिटेशन ब्रह्मकुमारी दिव्या दीदी यांनी सांगितले. सॉफ्ट स्कील ट्रेनर बी.के. भारती बुलानी यांनी विद्यार्थ्यांना डेटर्मिनेशन, लिसनिंग स्किल ,केअरिंग अँड पियर प्रेशर इत्यादी विषयांवर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज द्वारे मार्गदर्शन केले. बी.के. रजनी खंडेलवाल यांनी मूल्यांवर आधारित कथा कहाण्याद्वारे परमात्म्याची मैत्री कशी करायची? सात्विक जीवनशैली, सात्विक आहार, इत्यादी गोष्टींवर मार्गदर्शन केले


या शिबिराचा अंतर्गत विद्यार्थ्यांना आपल्या मनातील भावना ईश्वराला पत्राच्या रूपामध्ये लिहिणे म्हणजेच ईश्वराशी आपले नाते घट्ट करणे सकारात्मक संकल्प द्वारे पाणी चार्ज करणे ह्या गोष्टी शिकविण्यात आल्या दिनांक 12 मे रविवार रोजी शिबिराचा समारोप प्रसंगी डॉक्टर प्रतिमा राठी बी. डी. एस. एम. डी. एस. तसेच डॉक्टर प्रियंका सोनी बी.डी.एस. यांनी मुलांना दाताचा आरोग्याबद्दल प्रोजेक्टर द्वारे माहिती दिली तसेच दातांची तपासणी ही करण्यात आली

शेवटी सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी शकुंतला दीदी यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले व प्रत्येक विद्यार्थ्याला ईश्वरीय वरदान तसेच पेन भेट करण्यात आला या शिबिरा अंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज सात्विक ईश्वरीय आठवणीत बनवलेला फराळही देण्यात आला मोठ्या संख्येने विद्यार्थी या शिबिरामध्ये सहभागी झाले



Post a Comment

أحدث أقدم