छत्रपती राजे संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्या मोटरसायकल रॅली
खामगाव (जनोपचार )- छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उद्या मंगळवार दि. १४ मे रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये छत्रपती संभाजीराजे प्रेमी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा पाटील युवक समितीचे संस्थापक अध्यक्ष गजाननदाद ढगे पाटील यांनी केले आहे. मंगळवार दि.१४ मे रोजी सकाळी १० वाजता मोटारसायकल रॅली छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम शिवाजीनगर येथून सुरुवात होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गाने रॅली निघणार असून दुपारी रॅलीच समारोप होणार आहे. तरी या मोटरसायकल रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने छत्रपती संभाजी राजे यांचे विचारांनी प्रेरित व त्यांच्यावर प्रम करणारे सर्वानी तसेच मरा। पाटील युवक समितीच्या सर्व पदाधिकारी व समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा पाटील युवक समितीचे संस्थापक अध्यक्ष गजाननदादा ढगे यांनी केले आहे.

إرسال تعليق