टाकळी वतपाळ येथील ३०० घरात अंधार !
नवीन मीटर द्या अन्यथा
नांदुरा तालुक्यातील टाकळी वतपाळ येथील कोरोना काळातील घरगुती थकीत विजबिल असलेल्या विद्युत देयकाचे टप्पे पाडून मिळणेबाबत तसेच लाईन कट झालेल्या घरांना घरगुती नवीनवीज कनेक्शन देण्यात यावे अशी मागणी करत विज जोडणी करून नवीन मीटर न दिल्यास येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा टाकळी वतपाल येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
![]() |
| .....जाहिरात..... |
याबाबतचे निवेदनही त्यांनी तहसीलदारांना दिले या नियोजनात नमूद आहे की, आम्ही मौजा टाकळी वतपाळ येथील ग्रामस्थ आपणांस नम्र निवेदन सादर करतो की, आम्ही सर्व टाकळी वतपाळ ता. नांदुरा जि.बुलडाणा येथील कायम रहिवाशी असून आमचे घरातील घरगुती विज कनेक्शनचे वीज बिल कोरोना काळामध्ये थकीत राहिलेले होते. तसेच त्यानंतर सतत दोन वर्षे दुष्काळ पडल्यामुळे आम्ही विजबिल भरू शकलो नाही. असे असताना सुध्दा आम्ही महावितरणचे कनिष्ठ अभियंता यांना विद्युत बिलाचे टप्पे पाडून मागितले पण त्यांनी आम्ही ग्रामस्थांची परिस्थिती विचारात न घेता सर्व थकीत विजबिल धारकांचे मिटर जप्त करून नेले आहे.
![]() |
| जाहिरात. |
त्यामुळे गावातील जवळपास ३०० हुन अधिक कुटूंब अंधारात राहत आहे. तसेच आम्ही सर्व कुटूंबानी आमचे घरामध्ये नवीन विद्युत मिटर साठी अर्ज करत आहे पण महावितरणचे अधिकारी यांनी थकीत बिल भरा मग मिटर देतो असे सांगितले आहे व तुम्ही थकीत बिलांचा भरणा केल्यानंतर व महावितरणकडे मिटर उपलब्ध झाल्यावर विजकनेक्शन देऊ असे सांगितले आहे. मात्र कोणतेही मीटर देण्यात आले नाही. त्यामुळे आता ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.



إرسال تعليق