मानवाला एकत्वाच्या सूत्रात गुंफणारा – मानव एकता दिवस

व्यापक देशव्यापी रक्तदान अभियान व सत्संग समारोहांचे आयोजन

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-  सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या असीम कृपाआशीर्वादाने छत्रपती संभाजीनगर झोनमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव ब्रँच मध्ये आयोजित संत निरंकारी सत्संग भवन, घाटपुरी येथे मानव एकता दिवसानिमित्त दि.२४ एप्रिल, २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. हा दिवस युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांचे परोपकारी जीवन आणि त्यांच्या लोककल्याणकारी भावनेला समर्पित आहे. या कार्यक्रमात स्थानिक परिसरातील श्रद्धालु, भक्तगण सहभागी होऊन बाबा गुरबचनसिंहजी आणि मिशनचे अनन्य भक्त चाचा प्रतापसिंहजी यांना आपली श्रद्धा सुमने अर्पण करून त्यांच्या जीवनातून प्रेरणा प्राप्त केली. 

       रक्तदान महादान - सेवेचे लक्ष्य महान

उल्लेखनीय आहे, की युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी यांनी सन् १९८६ मध्ये सुरु केलेल्या रक्तदानाच्या परोपकारी मोहिमेने आता महाअभियानाचे रूप धारण केले असून त्याचा चरमोत्कर्ष झाल्याचे पहायला मिळत आहे. या शिबिरांमध्ये आतापर्यंत १३,३१,९०६ युनिट रक्त मानवमात्राच्या भल्यासाठी दिले गेले असून या सेवा निरंतर जारी आहेत.

याचप्रमाणे दिल्लीसह संपूर्ण देशभर विशेष सत्संग व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संत निरंकारी मंडळाचे सचिव आणि समाजकल्याण विभागाचे प्रभारी आदरणीय श्री.जोगिन्दर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की सद्गुरुच्या असीम कृपेने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अवघ्या विश्वामध्ये विविध ठिकाणी संत निरंकारी मिशनची समाजकल्याण शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने रक्तदान शिबिरांच्या अविरत श्रृंखलेचे व्यापक स्तरावर आयोजन केलेले होते. ज्यामध्ये मानवतेच्या भल्यासाठी रक्तदात्यांकडून रक्तदान करुन नि:स्वार्थ सेवेचे उदाहरण प्रस्तुत केले. या शिबिरामध्ये रक्त संकलन करण्यासाठी स्थानिक इस्पितळांचे डॉक्टर्स व नर्स रक्त संकलित करण्यासाठी उपस्थित होते. तरी स्थानिक ब्रँच मध्ये ज्या ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते तेथे इच्छुक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करुन या परोपकारी कार्यामध्ये ऊत्सुर्तपणे सहभाग नोंदवला. 

..,.जाहिरात...

युगप्रर्वतक बाबा गुरबचनसिंहजी यांनी आपले संपूर्ण जीवन मानवतेच्या कल्याणार्थ समर्पित केले. त्यांनी ब्रह्मज्ञानाद्वारे मानवाला मानवाशी जोडून प्रेम व गोडीगुलाबीने नांदण्याची निर्मळ धारा प्रवाहित केली. प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांनी आपले स्थान निर्माण केले. प्रत्येक भक्ताच्या जीवनाला वास्तविक रूपात एक व्यावहारिक दिशा प्रदान केली. ज्यासाठी मानवता त्यांची सदैव ऋणी राहील. त्यांची दिव्य शिकवण वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज सत्य ज्ञानाच्या रूपात सर्वत्र प्रवाहित करत आहेत ज्याच्या प्रकाशाने प्रत्येक मानव आपले जीवन सकारात्मक रूपात कल्याणकारी बनवत आहे. 




Post a Comment

أحدث أقدم