संजय बगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या डॉ. श्याम देवकर जाहीर व्याख्यान
![]() |
| सत्यशोधक परिवाराचा उपक्रम |
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- सत्यशोधक जनसेवा समितीचे राज्य सचिव श्री संजय बगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दिनांक 9 मे 2024 रोजी जाहीर व्याख्यानाच्या आयोजन करण्यात आले आहे .सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. श्याम देवकर यांच्या वराळातील सत्यशोधक चळवळ या विचारावर हे व्याख्यान आयोजित आहे खामगाव येथील वामन नगर स्थित माळी भवन या परिसरात सायंकाळी सहा ते आठ या दरम्यान हे व्याख्यान पार पडणार आहे
![]() |
| .........जाहिरात....... |
तरी या व्याख्यानाचा सर्वसामान्य नागरिक तसेच जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन सत्यशोधक समितीचे अध्यक्ष सुरेश वावगे यांनी केले आहे . महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराला अभिवादन करून त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक विचारांची पेरणी या माध्यमातून करण्यात येणार आहे तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे
![]() |
| .......जाहिरात...... |



إرسال تعليق