शिवनेरी ग्रुप द्वारा आयोजित आमदार आकाश दादा फुंडकर गरबा उत्सव 2024 थाटात संपन्न

खामगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क :-स्थानिक शिवनेरी ग्रुप खामगाव च्या वतीने नवरात्री उत्सवामध्ये आमदार आकाश दादा फुंडकर गरबा उत्सव 2024 चे आयोजन भव्य दिव्य स्वरूपात नगर परिषद शाळा क्रमांक ६, टॉवर चौक खामगावयेथे 03 ऑक्टोंबर ते 11 ऑक्टोबरपर्यंत रोज सायंकाळी६ ते १० वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले होते. नेहमी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणाऱ्याशिवनेरी ग्रुप द्वारा आयोजित आमदार आकाश दादा फुंडकर गरबा उत्सव 2024 चे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते.

03 ऑक्टोंबर ला गरबा उत्सवाचे भव्यदिव्य उदघाटन खामगाव विधान सभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आकाश दादा फुंडकर यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. त्यानंतर सासू एक नंबरी सून दस नंबरी, आपली बहीण लाडकी बहिण,भारतीय लोकनृत्य वेशभूषा, बाई पण भारी देवा व प्रिन्स, प्रिन्सेस व क्वीण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वरील सर्व स्पर्धांमध्ये सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावर्षीच्या आमदार आकाश दादा फुंडकर गरबा उत्सव 2024 चे प्रिन्सेस कुमारी वृंदा फुलांबरकर,  क्वीन सौ. प्राची खोपले यांना ई बाईक व प्रिन्स  याला गेअर ची सायकल व ट्रॉफी तथा विविध स्पर्धा मध्ये विजय झालेल्या स्पर्धकांना देऊन गौरविण्यात आले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रवेश द्बारा वर आपल्या संस्कृतीला शोभेल असा अष्टगंद टिळा लावूनच प्रवेश देण्यात आले. शिवनेरी ग्रुपच्या या उत्सवामध्ये महिलांचा गरबा खेळण्याकरिताचे प्रमाण ही सर्वांत जास्त असायचा.विशेष करून गरबा खेळण्याकरिता खामगाव तालुक्यातील कुंबेफळ, जळका भंडग,ढोरपगाव, वाडी,सुटाळा तसेच नांदूरा येथून ही गरबा प्रेमीं मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले होते.

शिवनेरी ग्रुप च्या वतीने आयोजित आमदार आकाश दादा फुंडकर गरबा उत्सव 2024 ला टायटल पार्टनर म्हणून आमदार आकाश दादा फुंडकर तसेच विशेष सहकार्य सागरदादा फुंडकर, यासह स्टेज पार्टनर म्हणुन सरस्वती ग्लासचे संचालक मनोहरलाल जांगिड, ग्राउॅड पार्टनर म्हणून  महेंद्र काका रोहणकार, तिकीट पार्टनर म्हणून मनोज काका खत्री, ट्राफी पार्टनर म्हणून छत्रपती प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा जय हिंद लोक चळवळ चे जिल्हा समन्वयक स्वप्नील दादा ठाकरे पाटील, सेंटर पिलर पार्टनर म्हणून  प्रमोद नोवाल,  अमितजी जांगीड, योगेश पाटील,  हेंड पाटील, राजेश  चौधरी,  मंगेश गोसावी,  अतुल माहुरकर, संदिप काटोले, सुरज अग्रवाल, किसनजी पुरवार, प्रसाद बाठे,शिवनेरी ग्रुप चे सल्लागार आनंदजी चांडक, हनुमंतजी भोसले व खामगाव प्रेस क्लब खामगाव तसेच पोलिस प्रशासन, न.प.प्रशासन, शाळा क्रं 6 चे सर्व शिक्षक वृंद यांच्यासह सर्व स्पर्धांमध्ये सहभागी स्पर्धकांचे तसेच गरबा प्रेमींचे शिवनेरी ग्रुपला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शिवनेरी ग्रुप खामगाव च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे आपल्या सर्वांचे आभारी आहेत.

Post a Comment

أحدث أقدم