काल झालेल्या पावसामुळे नांदुरा तालुक्यातील सोयाबीनचे नुकसान
त्वरित पंचनामे करण्यासाठी उबाठा चे निवेदन
नांदुरा जनोपचार न्यूज नेटवर्क :- काल झालेल्या पावसामुळे नांदुरा शेतकऱ्यांचे सोयाबीन वाया गेले. शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी या करिता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे नांदुरा तालुका व शहराच्या वतीने आज दसऱ्याचा दिवशी नांदुरा तहसिल ला निवेदन देण्यात आले
यावेळी वसंतराव भोजने, लाला भाऊ इंगळे, संजय सिंग जाधव, ईश्वर पांडव ,रमेश पाटील, सागर वावटळीकर, राजेश बोहरा ,नितीन पाटील, राहुल रहाणे ,अनिल मुके ,श्रीराम दाभाडे, निलेश चांदलकर, परमेश्वर रावणचवरे ,ऋषिकेश नायसे ,ज्ञानेश्वर कुटे ,विकी दादा चोपडे ,इत्यादी शिवसैनिक शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते


إرسال تعليق