खामगावात झटका.. निळकंठ नगराची शान अजय निळे भाजपात.
नीलकंठ नगर व परिसराचा विकास होत नसल्याने घेतला निर्णय-अजय निळे
खामगाव:- खामगावच्या नकाशावर असलेल्या निळकंठ नगर व परिसराचा विकास होत नसल्याने अजय निळे यांनी भाजपात प्रवेश करून विकास साध्य करण्याचा निर्णय घेतला. काल ११ ऑक्टोंबर रोजी अजय नीळे यांनी आमदार आकाश दादा फुंडकर यांच्या कुशल नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश घेतला. त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी देखील आनंदित वातावरणात प्रवेश घेतला.
यावेळी शेखरभाऊ पुरोहित संजय शिनगारे वैभव डवरे प्रवीण कदम पवन गरड राकेश राणा अनिश जमादार विजय उगले अजिंक्य उपस्थिती होती. यावेळी आमदार आकाश दादा फुंडकर म्हणाले की, निळकंठ नगर व परिसरातील समस्या आम्ही जाणून आहोत. पिण्याच्या पाण्याची मुख्य समस्या या भागाची होती त्यामुळे प्रथमता या समस्येला महत्त्व देऊन महत्त्वकांक्षी योजना मंजूर करून लवकरच या भागात पाणीपुरवठा सुरू होणार आहे.
अजय निळे यांच्यासारखा मेहनती कार्यकर्ता पक्षाला मिळाला निश्चितच याचे फलस्वरूप विकास कामांना मिळणार आहे. यावेळी अजय निळे यांचा जयघोष करण्यात आला. प्रवेश कार्यक्रमात निळकंठ नगरातील बहुतांश नागरिक उपस्थित होते.






إرسال تعليق