दखलपात्र गुन्ह्याची अदखलपात्र नोंद केल्याप्रकरणी सुरज यादव यांची जिपोअ कडे तक्रार! 

 खामगाव :- सामाजीक कार्यकर्ते सुरज शिवमुरत यादव यांनी आज ११ ऑक्टोबर २४ रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक बुलढाणा यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामध्ये नमुद केले आहे की, माझ्या शेतातील विहीरीतुन रातुन इले. मोटार (किं. १६,५०० रु.) व ५० फुट इले. वायर (किं. १८०० रु.) एकूण १८ हजार ३०० रूपयाची चोरी झाल्याबाबतची तक्रार शिवाजी रोजी दिली आहे. तक्रारीसोबत मोटर व बावर खरेदीचे बिलसुध्दा जोडले होते. तरीसुध्दा पोलिसांनी चोरी गेलेल्या मुद्देमालाची किंमत ४ हजार ९०० रु. ठरवुन अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे व तक्रारीवर सही करण्यास सांगीतले. तरी माझ्या तक्रारीची चौकशी करून दखलपात्र गुन्ह्याची नोंद करून चोरट्याचा शोध घ्यावा. तसेच अदखलपात्र गुन्हा नोंदविणा-या पोलिस अधिकाऱ्याविरूध्द कारवाई करावी. तक्रारीची दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा सुरज यादव यांनी तक्रारीत दिला आहे.

Post a Comment

أحدث أقدم