सिद्धीविनायक टेक्नीकल कॅम्पसचे प्रा. डॉ. अशोक पुरुषोत्तम कंकाळे यांना कलिंगा युनिक्रसिटी येथून आचार्य पदवीने सन्मानित

खामगाव (नितेश मानकर) वसुंधरा बहुउद्देशिय सामाजिक संस्था, खामगांव व्द्वारा संचालीत सिद्धीविनायक टेक्नीकल कॅम्पस, शेगांव येथील प्राध्यापक डॉ. अशोक पुरुषोत्तम कंकाळे यांना कलिंगा युनिव्हसिटी येथून आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले. कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरींग हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. मोबाईल पेमेंट टेक्नॉलॉजी, फिंगर पिन्टू व क्यु आर कोड हया संबंधी संशोधन करुन डॉ. आर. के. देशमुख यांचे मार्गदशनात कलिंगा युनिव्हसिटी मधुन संशोधन केले होते. त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातुन करुन, राजर्षी शाहू इंजिनिअरींग कॉलेज, बुलढाणा तसेच मावन इंजिनिअरींग कॉलेज, अकोला येथे त्यांनी संगणक विभागामध्ये काम केले. त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे विविध संस्था चालक तसेच कॉम्प्युटर शाखेमधुन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सद्म स्थितीत वसुंधरा बहुउद्देशिय सामाजिक संस्था द्वारा संचालित सिद्धीविनायक टेक्नीकल कॅम्पस, येथे व्हाईस प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. वरील सर्व कार्याचे श्रेय ते आपले वेळोवेळीचे सहकार्य करणारे वरिल सर्व संस्था चालकांना देतात. तसेच वसुंधरा बहुउद्देशिय सामाजिक संस्था, खामगांवचे अध्यक्ष  सागरभाऊ फुंडकर, आई वडील अॅड. पी. आर. कंकाळे व सौ. मनोरमा कंकाळे तसेच आमचे मित्र प्राचार्य डॉ. अनंत जी. कुळकर्णी यांना देतात.

Post a Comment

أحدث أقدم