राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, खामगांव नगरचा विजयादशमी उत्सव रविवारी
खामगाव: आपल्या हिंदू समाजामध्ये पुरुषार्थ, शौर्य आणि पराक्रमाचे जागरण श्री विजयादशमीच्या पावनपर्वावर होत असते. या वर्षी खामगाव नगर विजयादशमी उत्सव अश्विन शुद्ध एकादशी रविवार १३ ऑक्टोबर ला सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नगर परिषद शाळा क्रमांक 6 च्या मैदानावर आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मनोज तेजपाल शाह,सराफ असो. खामगाव व बुलडाणा अध्यक्ष तर प्रमुख वक्ते मुकुल कानिटकर, अखिल भारतीय प्रचार टोळी सदस्य रा.स्व.संघ, यांची उपस्थित राहणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी ४.30 वाजता न.प.शाळा क्र.६ च्या मैदानावरून पूर्ण गणवेश तथा दंडासह पथसंचलन शहरातील प्रमुख मार्गावरून निघणार आहे. तरी सर्व स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात दंडासह या पथसंचलनात सहभागी व्हावे. तथा कार्यक्रमास सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन नगर संघचालक प्रल्हाद निमकंडे यांनी केले आहे.

إرسال تعليق